Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

2000 च्या नोटा चलनातून मागे घेणारः RBI

  


नवी दिल्ली: रिझर्व्ह बँक २००० च्या नोटा चलनातून मागे घेणार आहे. परंतु सध्याच्या नोटा अवैध होणार नाहीत. नोव्हेंबर २०१६ मध्ये २ हजारांची नोट बाजारात आली होती. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या नोटा बंद केल्या होत्या. त्याच्या जागी नवीन पॅटर्नमध्ये ५०० आणि २००० च्या नव्या नोटा जारी करण्यात आल्या होत्या. आरबीआयने २०१९ पासून २०००च्या नोटांची छपाई बंद केली आहे. आरबीआयने बँकांना या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत बदलत राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. एका वेळी केवळ २०,००० रुपये मूल्याच्या नोटाच बदलता येतील. तर बँका आतापासूनच २०००च्या नोटा ग्राहकांना देणार नाही.

2016 मध्ये नोटाबंदीच्या वेळी, भ्रष्टाचाऱ्यांच्या घराच्या गादया आणि उशांमध्ये दडवलेला किमान 3-4 लाख कोटी रुपयांचा काळा पैसा बाहेर येईल, अशी केंद्र सरकारची अपेक्षा होती. या संपूर्ण प्रक्रियेत केवळ 1.3 लाख कोटी रुपयांचा काळा पैसा बाहेर आला. पण आता नोटाबंदीच्या वेळी जारी करण्यात आलेल्या 500 आणि 2000 च्या नव्या नोटांमधून 9.21 लाख कोटी रुपये नक्कीच गायब झाले आहेत.


                भारतीय रिझर्व्ह बँकेचे 2016-17 ते 2021-22 पर्यंतचे वार्षिक अहवाल दाखवतात की RBI ने 2016 पासून 500 आणि 2000 च्या एकूण 6,849 कोटी चलनी नोटा छापल्या आहेत. त्यापैकी 1,680 कोटींहून अधिक चलनी नोटा चलनातून गायब आहेत. या गहाळ नोटांची किंमत 9.21 लाख कोटी रुपये आहे. या हरवलेल्या नोटांमध्ये त्या नोटांचा समावेश नाही ज्या खराब झाल्यानंतर आरबीआयने नष्ट केल्या होत्या.


                                                नोटांच्या छपाईत 76 टक्के वाढ

सरकार मान्य करत नाही, पण काळा पैसा 500 आणि 2000 च्या नोटांमध्येच जमा होतो, म्हणून 2019 पासून 2000 च्या नोटांची छपाई बंद अधिकाऱ्यांचे मत आहे की काळा पैसा जमा करण्यासाठी सर्वात जास्त वापर मोठ्या मूल्यांच्या म्हणजेच 500 आणि 2000 च्या नोटांचा होतो. कदाचित याच कारणामुळे 2019 पासून 2000 च्या नोटांची छपाई थांबली आहे. पण 2016 च्या तुलनेत 500 च्या नवीन डिझाईनच्या नोटांच्या छपाईत 76टक्के वाढ झाली आहे. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की घरांमध्ये जमा होणारी रोख रक्कम ही एकूण काळ्या पैशाच्या केवळ 2-3टक्के आहे