Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

‘त्या’ सहा वर्षीय बालिकेचा अखेर मृतदेहच आढळला; दगडाने ठेचून हत्या, समाजमन सुन्न

 


        चिखली रोहड येथील तपोवन देवी संस्थान मध्ये लग्न सोहळ्यातून एक ६ वर्षाची मुलगी १२ मे रोजी बेपत्ता झाली होती पोलिसांनी शोध घेतला असता १३ मे रोजी तिचा मृतदेह मंदिराच्या पाठीमागील जागेवर आढळून आला. मुलीच्या चेहऱ्यावरील आणि गळ्यावर संशयास्पद खूना दिसून आल्याने मुलीचा खून का केला? कशासाठी केला ? अशी चर्चा सुरू झाली आहे.अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रोहडा येथे गावाच्या पूर्वेस एक किलोमीटर अंतरावर जिल्ह्यात प्रसिध्द असलेले एक मोठे तपोवन देवी संस्थान आहे. या संस्थानमध्ये दररोज विविध कार्यक्रमांची वर्दळ असते त्यामध्ये १२ मे रोजी चिखली तालुका देऊळगाव राजा तालुक्यातील येथील तांबुळवाडी व महारखेड येथील लग्न समारंभाचा कार्यक्रम तपोवन देवी संस्थान रोड येथे आयोजित केला होता.

         त्या कार्यक्रमासाठी कू राधिका विलास इंगळे वय ६ वर्ष सहा रा. तामसी तालुका बाळापूर जिल्हा अकोला ही मुलगी आई वडीला सोबत लग्नाला आली होती. लग्न सोहळा असल्याने सर्व आप आपल्या कामात व्यस्त होते. कु. राधिका ही सकाळ पासून ११ वाजेपर्यंत लग्नात दिसून येत होती मात्र अचानक त्यानंतर दिसून आली नाही म्हणून शोध घेतला असता कुठेही मिळून आली नाही मुलगी बेपत्ता झाल्याची चर्चा सर्वत्र पसरली आणि नातेवाईकांनी पोलिस स्टेशनला जावून हरविल्याची तक्रार दाखल केली.

        पोलीस डायरीला हरविल्याची नोंद दाखल होताच ठाणेदार गणेश हिवरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी यामावार यांच्या सह दुय्यम ठाणेदार, बिट अमलदार तसेच पोलीस कर्मचारी तसेच गावकरी सकाळ पासून तपोवन देवी संस्थान परिसराची झाडाझडती घेवून संपूर्ण परीसर पिंजून काढत होते शोध घेत होते. या मुलीचा शोध घेण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी यामावार, ठाणेदार दुय्यम ठाणेदार, बिट अमलदार तसेच पोलीस कर्मचारी तसेच गावकरी सकाळ पासून तपोवन देवी संस्थान परिसराची झाडाझडती घेवू लागले होते. 

    इकडे मात्र मुलगी सापडत नसल्याने आई वडिलांच्या हृदयाचे ठोके वाढत होते, शोध घेत असतांना मंदिराच्या मागील परिसर डोंगराळ असून ५०० मीटर अंतरावर कु. राधिकाचा मृतदेह सापडला. परंतु कु. राधिकाचा चेहरा, गळ्यावरील खूना संशयास्पद दिसून आल्याने तिची हत्या कोणी केली ? आणि कशासाठी केली? हा एकच मोठा प्रश्न अनेकांना पडला त्यामूळे पोलिसांच्या तपासा नंतरच कू राधिकाच्या मृत्यचे कारण समोर येणार हे मात्र खरे