● चिखली प्रतिनिधी
तपोवन परिसरात झालेल्या चिमुकलीचय संशयास्पद मृत्यूच्या पार्श्वभूमीवर चिखली येथे सोमवारी, दि. १५ मे रोजी बंद पुकारण्यात आला आहे. या बंदमध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन कपिल खेडेकर यांनी केले आहे.शहरात अनेकवेळा बंद पुकारण्यात आले. कोणतीही दुर्दैवी घटना घडल्यास नागरिकांनी आपल्या व्यावसायिक नफ्या- तोट्याचा विचार न करता नेहमीच सामजिक व भावनिकतेचे दर्शन घडविले व प्रत्येक दुर्दैवी घटनेचा स्वयंस्फूर्तीने निषेध केला.
असा बंद कोणत्याच जाती-धर्माच्या किंवा कोणत्याही व्यावसायिकांना त्रास देण्यासाठी किंवा कोणत्याही प्रकारच्या जीवित, अर्थिक नुकसान करण्यासाठी नसतो. आपल्यावरील अन्याय किंवा समाजातील घडलेल्या दुर्दैवी घटनांकडे प्रशासनाचे व सरकारचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी तसेच आपल्याला न्याय मिळण्यासाठी बंद पुकारण्यात येत असतो.तपोवन येथे निरागस चिमुकलीसोबत घडलेला प्रकार हा मनाला धक्का लावणारा आहे. या पार्श्वभूमीवर हा बंद पुकारण्यात येत असल्याचे खेडेकर यांनी म्हटले आहे. या बंदमध्ये नागरिकांसह व्यावसायिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.