Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नापिकी व कर्जबाजारीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

  


मलकापूर प्रतिनिधी:

विवरा (ता. मलकापूर) येथील रहिवासी व अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. मृत शेतकरी संजय सावजी कडू (वय ४७) रा. विवरा ता. मलकापूर यांनी शुक्रवारी (ता. १२) संध्याकाळच्या सुमारास विषप्राशन केले. दरम्यान, त्यांना तात्काळ उपचारासाठी मलकापूर येथील डॉ. कोलते येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोलते यांच्याकडे उपचार सुरू होते परंतु तब्येतीत काही सुधारणा होत नाही असे दिसताच डॉक्टरांनी त्यांना बुलडाणा येथे हलवण्यास सांगितले सदर संजय कडू यांना बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे नेण्यात आले परंतु (दि. १३) उपचारादरम्यान संध्याकाळी त्यांचा मृत्यू झाला. संजय यांच्याकडे २ एकर शेती असून, त्यांच्या उपजीविकेचे शेती हे एकमेव साधन होते. मात्र शेतीवर उपजीविका भागत नसल्याने ते रोजंदारी करून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करीत होते,

 तसेच शेतीवर घेतलेले दि. बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक म. बुलडाणा शाखा धरणगाव या बँकेचे पीक कर्ज ३५०००/रु. तसेच बचत गट व अन्य स्वरूपातील कर्ज फेडण्यात अपयश येत असल्याने व निसर्गाच्या लहरीपणामुळे संजय कडू हे चिंताग्रस्त झाले होते. घेतलेले कर्ज फेडण्यासाठी कुठलीच शक्यता डोळयासमोर दिसत नाही. हाती येणारे उत्पन्न अत्यंत कमी, शेती उत्पादनांना भाव नाही, अशी अनेक संकट समोर असल्याने गेल्या काही दिवसांपासून ते चिंताग्रस्त झाले होते. अखेर हताश होऊन त्यांनी जीवन संपविण्याचा टोकाचा निर्णय घेतला. गावात एका कष्टकरी शेतकऱ्यांची अशा पद्धतीने आत्महत्या झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत शेतकरी संजय कडू यांच्या पश्चात पत्नी, म्हातारी आई. १ मुलगा, १ मुलगी असा परिवार आहे.