या बाबत सविस्तर असे की मलकापूर शिक्षण समिती अंतर्गत हिराबाई संचेती कन्या शाळेवर चपराशी पदावर पंडितराव माहुरकर हे काम करीत असताना त्यांचा मृत्यू झाला होता त्यानंतर त्यांच्या मृत्यू नंतर त्यांचा मुलगा सतत बिन पगारी 2012 पासून त्या संस्थेत काम करीत होता मात्र त्याला कागदोपत्री पर्मनंट करून घेण्यासाठी 2 लाख रुपयांची मागणी केली होती आज तक्रारदार आशिष पंडितराव माहुरकर यांच्या तक्रारीची दखल घेत मलकापूर शिक्षण समितीतील लिपीकाला रंगेहाथ 1 लाख रुपयांची लाच घेताना पकडले वृत्त लिहे पर्यंत गुन्हा दाखल होणे सुरू होते. मात्र मलकापूर मतदार संघाचे माजी आमदार हे ह्या संस्थेचे अध्यक्ष पदावर आहेत व सचिव अशोक अग्रवाल हे आहेत ह्या प्रकरणामुळे माजी आमदार चैनसुख संचेती व सचिव अशोक अग्रवाल यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. असे प्रकार या पूर्वीही घडल्याचे नाकारता येत नाही याबाबत संस्थेच्या संचालक मंडळास माहिती होती की नव्हती असा प्रश्न जनसामान्यान मध्ये उपस्थित होत आहे