बुलढाणा : शेगाव - वरवट मेन रोड वरील हॉटेल गौरव बार अँड रेस्टोरंट मध्ये सुरु असलेल्या जुगार अड्डयावर अमरावती परिक्षेत्राचे पोलीस महानिरिक्षक चंद्रकिशोर मिना यांच्या मार्गदर्शनाखाली कोटी रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. सविस्तर वृत्त अशे कि, मागील काही महिन्यापासून शेगाव शहरावरुन काहीच अंतरावर असलेल्या गौरव बार मध्ये खुलेआम जुगार सुरु होते. बुलढाणा जिल्ह्यात या जुगार खेळणाऱ्यांवर कोणाचेच वर्चस्व राहिलेले नव्हते. पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे जुगारी व मालकास वाटायचे कि आपल्यावर कोणीच छापेमारी करु शकत नाही.
जिल्ह्यात एसपी, एएसपी, ५ उपविभागीय पोलीस अधिकारी, ३३ पोलीस स्टेशन, स्थानिक गुन्हे शाखा, विविध शाखांचे पोलीस निरिक्षण, सहाय्यक पोलीस निरिक्षण अशे अनेक अधिकारी आहेत. पंरतु या अधिकारी मध्ये एकपण अधिकाऱ्याला या जुगाराची माहिती नव्हती का ? माहिती होती तर त्यांनी कारवाई का केली नाही? अशे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. बुलढाणा जिल्ह्यात एवळी मोठ्या संख्येने पोलीस प्रशासन असल्यावर सुद्धा पोलीस महानिरीक्षक यांनी बाळापुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांना शेगावात पाठवून ३ जूनच्या संध्याकाळी अमरावती आयजींच्या पथकाने छापेमारी केली. तब्बल जिल्ह्यातील तर परजिल्ह्यातील जुगारी प्रेमी खुप लांबवून शेगावच्या हॉटेल गौरव बार वर आपल्या चारचाकी कारने किंवा दोनचाकी वाहनाने खेळायला यायचे.
या छापेमारीत ८१ जुगाऱ्यांना पोलीसांनी रंगेहाथ पकडले आहे. कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन १८१ मोबाईल, ७ लाख रुपयाची नकदी रक्कम, ५९ मोटरसायकल, १० चारचाकी गाड्या असा एकूण १ कोटी ८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती सुत्राकडून मिळाली आहे. या कारवाईमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली असून शेगाव शहर पोलीस ठाण्यात जुगार खेळणाऱ्यांसह हॉटेल मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई अमरावती परिक्षेत्राचे पोलीस महानिरिक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या मार्गदर्शनात यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी मिरखिलकर, नेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक रामकृष्ण जाधव व त्यांचे पथक यांनी पार पाडली. या कारवाई मुळे अमरावती व यवतमाळ जिल्ह्याच्या पोलीसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.