Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मुक्ताईनगरात ४६ वर्षीय इसमाची दगडाने ठेचून हत्या

  

         मयत रविंद्र मधूकर पाटील


मुक्ताईनगर । प्रतिनिधी 

मुक्ताईनगर येथे बोदवड रस्त्यावरील सातोड शिवारात रस्त्याच्या कडेला एका अनोळखी इसमाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सकाळी आढळून आला.यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून मयत हा चिनावल ता. रावेर येथील असल्याचे तपासाअंती समोर आले. मात्र, हत्येचे कारण गुलदस्त्यात असल्याने पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवली असून मारेकरी लवकरच गजाआड होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.


मुक्ताईनगर ते बोदवड रस्त्यावरील संत मुक्ताबाई मंदीर लगतच्या सातोड शिवारातील रस्त्यालगत एका इसमाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याची माहिती मुक्ताईनगर पोलीसांना सकाळी मिळाली. त्यानुसार पोलीसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली तसेच या घटनेची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक, पोलीस उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आल्याने त्यानीही घटनास्थळी भेट देवून पाहणी केली असता मयताची हत्या दगडाने व टणक हत्याराने केल्याचे दिसुन आले. यामध्ये मयताचा चेहरा छिन्नविछीन्न अवस्थेत असल्याने पोलीसांनी सुरुवातीला तपासाची चक्रे फिरवुन मयताची ओळख पटवली. यामध्ये मयत हा रविंद्र मधूकर पाटील वय -४६, रा. चिनावल ता. रावेर येथील असल्याचे समोर आले. मात्र, हि घटना कशी घडली ?, मयताची हत्या कुणी व का? केली याबाबत रात्री उशिरा पर्यंत माहिती काढण्याचे काम सुरू होते .तर या घटनेप्रकरणी मयताचा भाऊ योगेश मधुकर पाटील वय -४० रा. चिनावल यांनी फिर्याद दिल्यावरून पोलीस ठाण्यात भाग - ५ भादंवि कलम ३०२,२०१ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असुन घटनेचा सपोनि संदिप दुनगुहू तपास करीत आहेत.


                                            आरोपी पोलीसांच्या नजरेच्या टप्प्यात

सकाळी रविंद्र पाटील याचा मृतदेहा बाबत माहिती मिळताच मुक्ताईनगर व गुन्हे शाखेच्या पोलीसांनी वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे फिरवली असुन मारेकरी आरोपी पोलीसांच्या नजरेच्या टप्प्यात आले आहेत.तर या गुन्ह्यातील मारेकरी आरोपींना लवकरच गजाआड करण्यात येईल अशी माहिती समोर येत आहे .


                                                   घटनास्थळी यांनी दिली भेट

जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नजन पाटील प्रभारी आयपीएस अधिकारी सतीश कुलकर्णी मुक्ताईनगरचे डीवायएसपी राजकुमार शिंदे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ सपोनी संदीप दूनगहू पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद श्रीनाथ पोलीस नाईक संतोष नागरे तसेच या ठिकाणी फॉरेन्सिक लॅबचे पथक सुद्धा दाखल झाले आहे धर्मेंद्र ठाकूर रवींद्र धनगर विनोद सोनवणे रवींद्र मेढे तसेच मुक्ताईनगर डीएसपी कार्यालयाचे पोलीस नाईक कांतीलाल केदारे पोलीस नाईक देवसिंग तायडे