Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दैनिक सम्राट पत्रकार प्रा. रणजीत इंगळे यांची दीर्घुन हत्या करणाऱ्या आरोपीस तात्काळ अटक करून मृत पत्रकारांच्या कुटुंबास आर्थिक मदत करा --पत्रकार संघटनेची मागणी

 


            मलकापूर 19/6/23 येथे दै. वृत्तरत्न सम्राट या वृत्तपत्राचे अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रा. रणजीत इंगळे यांची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी तात्काळ अटक करून मृत पत्रकाराच्या कुटुंबास आर्थिक मदत द्या अशी मागणी हिंदी मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे उपविभागीय अधिकारी मार्फत करण्यात आली आहे.

निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकार आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजाचे विविध प्रकारचे सुख दुःख हे आपल्या लेखणी द्वारे शासनाचे निर्देश आणून देत असून शासन व जनता यामध्ये महत्त्वाचा दुवा म्हणून काम करीत असतो मयत पत्रकार हे दोन्ही पायांनी दिव्यांग असून देखील त्यांनी दिव्यांग बांधव व समाजाच्या न्याय हक्कासाठी नेहमीच आवाज उठविला असून त्यांना त्यांचा हक्क मिळून देण्यासाठी प्रयत्नशील होते अशा या आजाद शत्रू व्यक्तिमत्त्वाची हत्या करणे हे अत्यंत क्लेश दायक आहे त्यामुळे या हत्तेचा बुलढाणा जिल्हा पत्रकार संघटनेच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत आहे.


 पत्रकार रणजीत इंगळे हे अकोला येथील जुने शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खामगाव रोडवरील गंगानगर परिसरात  राहत असून रात्री अकरा वाजेच्या सुमारास घराकडे जात असताना मोबाईलवर कॉल आला व ते मोटरसायकल उभी करून मोबाईलवर बोलत असताना अज्ञात व्यक्तीने मागून येऊन त्यांच्या डोक्यात लोखंडी रोड घातल्याने डोक्यातून रक्तस्राव होऊन इंगळे रस्त्यावरच कोसळले मारेकऱ्यांनी जखमी इंगळे यांना ओढून नेऊन उभ्या असलेल्या ट्रकच्या मागे नेऊन टाकले व घटनास्थळावरून पसार झाले काही वेळाने ही घटना उघडकीस आली त्यानंतर पोलीस विभागाच्या वतीने घटनास्थळाचा पंचनामा केला आहे .

तरी आरोपीला तात्काळ अटक करण्यात येऊन मयत पत्रकार प्रा. रणजीत इंगळे यांच्या कुटुंबांच्या पालन पोषण जबाबदारी स्वीकारून या कुटुंबाला तात्काळ विशेष बाब म्हणून 50 लाख रुपयाची आर्थिक मदत देण्यात द्यावी अशी असे निवेदन म्हटले आहे   निवेदनावर दैनिक सम्राट चे पत्रकार सतीश दांडगे, तालुका अध्यक्ष  उल्हास शेगोकार, संपादक वीरसिंह राजपूत, हिंदी मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र अध्यक्ष धनश्रीताई काटीकर, पत्रकार एन, के .हिवराळे, राजेश इंगळे ,अजय टप, करणसिंग सिरस्वाल ,मनोज पाटील , आबिद बागवान , करण झनके,प्रभाकर इंगळे,  प्रकाश थाटे ,प्रदीप इंगळे, धर्मेशसिंग राजपूत, जमीन पत्रकार सय्यद ताहेर,तसेच निलेश चोपडे दिव्यांग फाउंडेशन अध्यक्ष यासह आदींच्या सह्या आहेत.