बुलडाणा (८) येथील जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले.
नांदेड जिलह्यातील बोंधार, (हंवेली) गावातील अक्षय भालेराव या दलीत तरुणाची जातीय द्वेषभावनेतून निर्धूण हत्या खून करणाऱ्या नाराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी
अशी मागणी समतेचे निळे वादळ या सामाजिक संघटनेचे बुलडाणा जिल्हा अध्यक्ष अशोकभाऊ दाभाडे आणि युवक जिल्हा अध्यक्ष ॲड कुणाल वानखेडे यांच्या नेतृत्वात देण्यात आले जनतेच्या वतिने आपणास निवेदनात मौजे बोंढार (हावेली) जिल्हा नांदेड येथील दलीत तरुणाची अत्यंत निर्घृणपणे जातीद्वेषातून धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली, या भीषण घटनेला संबंधीत गुन्हेगारांनी समाजमाध्यमातुन हिडीस पद्धतीने प्रचारीत व प्रसारीत केले या रक्तरंजित प्रकाराचे समर्थन जातीयवादी प्रवृत्तीच्या लोकांनी राजरोसपणे केल्याचे दिसुन येत आहे. खून करणे,खूनाचे उघड उघड समर्थन करणे, समाजमध्यामावर खुनाच्या प्रकाराचे दृश्य व्हायरल करणे या प्रकरणावरून हेच सिद्ध होते की गुन्हेगारांची हिम्मत वाढलेली आहे...
त्यांना कायद्याचा अजिबात धाक राहिला नसून राज्यात असे प्रकार घडत राहिल्यास ही अराजकता म्हणावी लागेल. आपल्या मूलभूत अधिकारसाठी पुढाकार घेणा-या युवकाचा अशा प्रकारे खुन ही बाब पुरोगामी म्हणविल्या जाणाऱ्या शाहू फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला काळीमा फासणारा आहे.सदर घटनेचा आम्ही तिव्र शब्दांत निषेध व निर्भत्सना करीत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले असून सदर प्रकरण जलद गती न्यायालयात चालवण्यात यावे, प्रकरणातील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी.
मृतक अक्षय भालेराव यांच्या कुटुंबाला पन्नास लक्ष रुपयाची तात्काळ आर्थिक मदत करण्यात यावी ! अशा समाजघातकी प्रवूत्तीला पायबंद घालण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलणे अत्यंत गरजेचे झाले आहे यास्तव गुन्हेगारांवर वचक बसविणेस शासनाने उदाहरणात्मक जबरी शिक्षा म्हणून यातील दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी.अशीही मागणी यावेळी करण्यात आली असून निवेदनावर सर्वश्री अशोक दाभाडे, ॲड.कुणाल वानखेडे,अरूनभाऊ डोंगरे,अनीलभाऊ खराटे आदींच्या सह्या आहेत