देशाच्या स्वतंत्र ला 75 वर्षे पूर्ण होऊनही अजूनही मागासलेला व गरजेत असलेल्या धनगर मेंढपाळ बांधवांच्या मागण्या संदर्भात वेळोवेळी निवेदन देऊनही जिल्हाधिकारी कार्यालय, वनविभाग व प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे ऑल इंडिया युवा मल्हार सेनेचे प्रदेश अध्यक्ष नंदूभाऊ लवंगे त्यांच्या नेतृत्वात पावसाळी अधिवेशनाच्या काळात दिनांक 19 जुलै रोजी विधिमंडळावर मेंढपाळ धनगर बांधवांचा भव्य आक्रोश मोर्चा काढला जाणार असून यामध्ये हजारोंच्या संख्येने मेंढपाळ बांधव त्यांच्या मुलाबाळांसकट सहभागी होणार आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की धनगर समाजाला गेली 75 वर्षे कोणताही न्याय मिळाला नसून ज्या योजना धनगर बांधवांसाठी सुरू झाल्या त्यावर फक्त नावापुरत्याच राहिल्या प्रत्यक्षात अंमलबजावणी मात्र झाली नाही वन अधिकारी प्रशासन व योजना राबवणाऱ्या लोकांकडून सतत पिळवणूक संदर्भात ऑल इंडिया मल्हार नवयुवक सेनेने प्रशासकीय कार्यालयांना निवेदने दिली परंतु त्यांचा उपयोग न झाल्याने अखेर 19 जुलै रोजी महामोर्चा चे आयोजन करण्यात आले असून यामध्ये प्रदेशाध्यक्ष नंदूभाऊ लवंगे, यशवंत सेनेच्या विदर्भ अध्यक्ष धनश्रीताई काटीकर पाटील, सचिन सपकाळ,Dr . पांडुरंग हटकर, गजानन कळंगे, दिलीप बिचकुले, नंदकिशोर खोंदले अनिल ढवळे यांच्या मार्गदर्शनात हजारोंच्या संख्येत मेंढपाळ बांधव पावसाळी अधिवेशन काळात विधिमंडळावर दिनांक 19 जुलै रोजी धडकणार असून मागण्या मान्य केल्याशिवाय पावसाळी अधिवेशन सुरळीत होऊ देणार नाही अशी भूमिका यावेळी मेंढपाळ बांधवांनी घेतली.
सदर मोर्च्याचे इशारा आज जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आला यावेळी नियोजन समितीमध्ये अनिल ढवळे, गोपाळ दांडगे, सागर भुंगे, रवी साखरे, फकीरा गावंडे, धोंडू गायकवाड , प्रभाकर बनसोडे, नंदू भुसारी , श्रीकृष्ण पाचपोर, सुभाष कवळे, प्रवीण कवळे, अभिषेक सुषिर, जगदीश सुषिर, संजय सुषिर, भास्कर कोल्हे, प्रभाकर घोंगे, सुरेश कोल्हे, पुनमचंद गोरे, तानाजी नेमाडे, दिलीप बिचकुले, शिलागोरे, मोतीराम नेमाने, मीना कोंदले , विनायक कवळे, रामेश्वर बनसोडे, ज्ञानेश्वर शिर्के, श्रीकिसन सोनार , भगवान सोरमारे , लखन देवकर, नंदू देवडे, कैलास बनसोडे , शंकरराव देवडे, राजू सोलार, केशव सोलार, संदीप सोलार ,जगन्नाथ कारळे, माणिकराव गोरे ,शुभम गावंडे, ज्ञानेश्वर कंकार ,केशवराव सोलर, शिवाजी देवडे, सुभाष चोपडे,यांची प्रामुख्याने उपस्थिती होती