मलकापूर
शहरातील नांदुरा नाक्यावर लक्ष्मी नगर जवळील नॅशनल हायवे क्रमांक सहावर असलेल्या उड्डाण पुलावर भीषण अपघात घडला. भरधाव वेगात असलेल्या दोन लक्झरी बस एकमेकांवर आदळल्या. या अपघातामध्ये एकूण सात प्रवासी ठार झाले असून 25 ते 30 प्रवासी काही गंभीर तर काही किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांवर बुलढाणा येथील सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटे 3 वाजेच्या सुमारास दोन्ही बसमध्ये टक्कर झाली. यातील एक लक्झरी बस (एमएच 08-9458) रॉयल कंपनीची असून दुसरी बस यात्रेकरूंची होती. अमरनाथ यात्रा संपवून ही लक्झरी बस (एमएच 27 बिएक्स 4466) हिंगोलीच्या दिशेने जात होती. तर रॉयल कंपनीची बस नागपूरकडून नाशिकच्या दिशेने रवाना होत असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर मिळालेल्या माहितीनुसार तीर्थयात्रींच्या बसमधील ड्रायव्हर सुद्धा या अपघातात ठार झाला आहे. घटनास्थळी एकूण 5 प्रवासी ठार झाले आहे ,तर 2 प्रवासी जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा या ठिकाणी दगावल्याची माहिती समोर येत आहे.
या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी सह कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन मदत कार्य सुरू करून जख्मीनां पोलीसांच्या वाहनाने मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.तर गंभीर जख्मीनां बुलढाणा जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.
जिल्हा पोलीस अधिक्षक सुनीलजी कडासने साहेब,अप्पर पोलीस अधिक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलिस अधिकारी गवळी सह आदींनी घटनास्थळी भेट देऊन जख्मींची विचारपूस केली.
मृतकांची नावे
1 संतोष आनंदराव जगताप रा. भाडेगाव ता. हिंगोली ड्रायव्हर
2 राधाबाई सखाराम गाडे रा जयपुर ता. हिंगोली,
3 अर्चना गोपाल गोडसे रा. लोहगाव ताल. हिंगोली,
4 सचिन शिवाजी महाडे रा. लोहगाव ता. हिंगोली,
5 शिवाजी धनाजी जगताप रा. भाडेगाव ता. हिंगोली