Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अखेर बहापुरा येथिल म. फुले नगरातील पाणीप्रश्न सुटला

 


 रविभाऊ वाकोडे यांच्या पाठपुरवठ्याला यश

        मलकापूर तालुका अंतर्गत येत असलेल्या मौजे बहापूर या गावात अनेक वर्षापासून कोट्यावधीचा निधी खर्चून पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी पाचगांव पाणी पुरवठा योजना सुरु करण्यात आली होती आणि आजही की त्या योजने अंतर्गत, चहापुरा पान्हेरा, बडोदा व वाघुळ येथे पाणी पुरवठा सुरु आहे. परंतु या गावामध्ये पाणी पुरवठा योजनेचा प्रकल्प उभारण्यात आला त्या गावामधील रेल्वेपलीकडील  महात्मा फुले नगर या भागात गावात पाणी उपलब्ध असुतसुद्धा रेल्वेच्या क्रोसिन्ग  मुळे पाणी पुरवठा विभाग या नगरमध्ये पाणी देण्यास असमर्थ ठरले होते. 

    परंतु शासनाच्या नविन पाणी पुरवठा योजनेमुळे अनेक वर्षापासून पाण्यापासून वंचीत असलेले महात्मा फुलेनगरातील पाण्याचा प्रश्न सुटला इसकी दूसरे महत्त्वाचे असे की, या नगरातील पाण्याच्या या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी या वाडीतील 10 वर्षापासून सदस्य. असलेल्या अश्विनी रविंद्र वाकोडे व त्यांचे पती रवी वाकोडे यांनी अनेकदा तत्कालीन आमदार चैनसुख संचेती व खासदार  रक्षाताई खडसे यांच्याकडे अनेकदा प्रश्न मांडूनसुद्धा त्यांनी महत्वाच्या  अडचणीकडे दुर्लक्ष करीत पाठ फिरवली शेवटी रविभाऊ वाकोडे यांनी ही समस्या जि.प उपसभापती सौ. मंगलाताई रायपुर व संतोष रायपुरे यांना सांगीतली व त्यांनी यावर मार्ग काढून व शेवटी त्यांच्या प्रयत्नाने अखेर या नगरात गुरुपोर्णीमेला पाणी मिळाले. महत्त्वाच्या असणाऱ्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बहापूरा येथील सामाजीक कार्यकर्ते श्री. रामराव शितोळे सरपंच, उपसरपंच तसेच सर्व ग्रा. पं. सदस्य यांचे मोलाचे सहकार्य मिळाले 

    याप्रसंगी पाणीपुरवठा उदघाटन साठी गावातील सरपंच - सौ पल्लवी चव्हाण उपसरपंच- सुरेश उमाळे सदस्य - सौ. अश्विनी वाकोडे, सिंधुताई कुटे , निर्मलालाई इंगळे सौ. वाघ सौ रीनाताई निकम श्री. जनार्धन इंगळे, सुरेश पवार, शरद सोनोने व ग्रामविकास अधिकारी श्री. गजानन झनके उपस्थीत होते शेवटी ग्रा. पं. च्या वतीने श्री रविभाऊ वाकोडे यांनी सर्वांचे आभार मानले.