दिनांक ११/०७/२०२३ रोजी पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी पो.स्टे. मलकापुर शहर यांना गोपनिय माहीती मिळाली की, हायवे क्र ०६ रोहणे मुक्ताईनगर रोड कडुन नांदुरा रोडणे एक बोलेरो पिकअप वाहन क्र एमएच- २८ बीबी- २०६० अशी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा व तंबाखु जन्य पदार्थ घेवुन जात आहे अशी गोपानिय बातमीदारांकडुन खात्रीलायक बातमी मिळाल्याने आम्ही स्वतह पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी व आमचे सोबत ग्रेड पोउपनि सुरेश रोकडे, नापोकों / ९६७ अमोल शेले, नापो कॉ / १२२६ शरद मुंडे, चालक पोहेकॉ / १०३३ रामेश्वर हटकर, पोकों १२५४ आनंद माने व पोस्टे स्टॉप असे शासकिय वाहणाने पोलीस स्टेशन मलकापुर शहर येथून रवाना होवुन हायवे क्र०६ वरील कुंड फाटयावर जवळ जावुन थांबुन येणाऱ्या पोस्टे जाणाऱ्या वाहणाकडे लक्ष देवुन पाहिले असता गोपानिय बातमीदाराने सांगितल्या प्रमाणे धरणगाव कडुन एक बोलेरो पिकअप पांढऱ्या रंगाची एमएच २८ बीबी- २०६० येताना दिसल्याने सदर वाहनाचे शासकिय वाहणाने पाठलाग करून सदरचे वाहन उडडान पुलावर थांबविले व वाहनाची पाहणी केली .
सदर वाहनात ०३ इमस दिसल्याने त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव १. चालक शेख इकराम शेख हुसैन वय २४ वर्ष २ शेख सलमान शेख अनवर दोन्ही रा. सिंधीपुरा ता. जि. बुहाणपुर मध्य प्रदेश ३ अरुण मधुकर राठोड वय ३२ वर्ष रा. बोरगाव ता. जि. बुऱ्हाणपुर असे सांगितल्याने सदरचे वाहन पोलीस स्टेशन येथे आणुन त्यांची पाहनी केली असता सदर वाहणामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा व तंबाखु जन्य पदार्थ असल्याची खात्री झाल्याने सदर वाहणातुन एकुण १६,८१,६००/- रुपयांचा मुददेमाल मिळुन आल्याने त्यांचेवर क्र ३६५/२०२३ कलम ३२८, २७२, २७३, १८८ भादवी सहकलम 26 (2 (i), 26 (2) (iv), 26 (2) (v), 27 (2) (e), 30 (2) (a),3,59 अन्न सुरक्षा आणि माणके अधिनियम २००६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास ग्रेड पोउपनि सुरेश रोकडे हे करीत आहेत. सदरची कार्यवाही व तपास मा. सुनिल कडासने साहेब पोलीस अधिक्षक बुलडाणा, मा. अशोक थोरात साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक खामगांव, मा. डि.एस. गवळी साहेब उपविभागिय पोलीस अधिकारी मलकापुर व पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी सा पोस्टे मलकापुर शहर यांचे मार्गदर्शना खाली मलकापुर शहर पोलीस स्टेशनचे ग्रेड पोउपनि सुरेश रोकडे, नापोकॉ ९६७ अमोल शेले, नापोकों / १२२६ शरद मुंढे, चालक पोहेकॉ / १०३३ रामेश्वर हटकर, पोकों / १२५४ आनंद माने यांनी केली आहे.