मलकापूर / प्रतिनिधी
ठेवीदारांचा विश्वास संपादन करून स्वीकारलेल्या ठेवी मुदतीत परत न करता त्यांचा विश्वासघात केल्या प्रकरणी उन्नती महीला नागरी सहकारी पतसंस्था मयी मलकापुरच्या संचालक मंडळावर ठेवीदारांनी दिलेल्या सातत्यपूर्ण लढयानंतर अखेरीस गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. तसेच रक्कम परत मिळुन न्याय मिळेल अशी अपेक्षा त्रस्त ठेवीदारांकडुन व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की उन्नती महीला नागरी सहकारी पतसंस्था विहित मुदत ठेव रक्कम न देता टाळाटाळ करत असल्याने वैभव गणेशराव पाटील वय ३२ वर्षे व्यवसाय शेती रा गजानन महाराज मंदिराजवळ कुलमखेड मलकापूर यांनी मलकापूर शहर पोलिसांत धाव घेऊन तक्रार नोंदविली. की, त्यांनी त्यांचे स्वतःचे व त्यांची पत्नी व मुलगा यांचे नावे उन्नती महीला नागरी सहकारी पथसंस्था मया मलकापुर या संस्थेतील वर नमुद आरोपी क्र १ते १४ यांनी फिर्यादी व इतर ठेवीदारांचा विश्वास संपादन करून स्वीकारलेल्या ठेवी मुदतीत परत केलेल्या नाहीत गैरकायदेशीर कर्ज वाटप केले आहे.
ठेविदाराचे ठेविचा रुपये ८१,२४,०००/- (एक्क्यांशी लक्ष चौविस हजार रुपये) अपहारकेल्याची कलम १५६ (३) जाफौ प्रकरण ६३/ २०२३ प्रमाणे दाखल केली असुन मा वि न्यालयाचे पत्र क्र ११३१/२०२३ दिनांक ०८/ ०६/२०२३ रोजीचे आदेशाप्रमाणे आरोपी १ सौ अंजली सुगतराव पंत वय ५६ धंदा व्यवसाय पंत नगर मलकापुर २. उषा दामोदरदासजी लखानी वय ६५ वर्षे धंदा व्यवसाय रचना गैस एजेंसी लखानी जिन सांदुरा रोड, मलकापुर ३. अपणी दिलीपराव देशपांडे वय ५० वर्षे धंदा व्यवसाय रा. किल्ला चौक मलकापुर ४. प्रभावती मधुकर भलभले वय ५५ वर्षे धंदा व्यवसाय र सालीपुरा मलकापुर ५. ज्योती गजानन पंत वय ६५ वर्षे धंदा व्यवसाय कुलुमखेड मलकापुर ६. मनिषा विवेक बापट वय ५० वर्षे धंदा व्यवसाय र भारतकला रोड
मलकापुर ७ नरसीम बेगम नासीर खान वय ५५ वर्षे धंदा व्यवसाय र पारपेठ मलकापुर ८. सुनिता अनंत चव्हाण वय ५० वर्षे धंदा व्यवसाय रा किल्ला चौक मलकापुर ९. वैशाली संतोषगीर गीरी वय ४० वर्षे धंदा व्यवसाय र पदमालय अपार्टमेंट मलकापुर १०. रुपाली सुरेश वैदय वय ५० वर्षे धंदा व्यवसाय रा शक्ती नगर गणपती नगर भाग मलकापुर ११ शर्मिष्ठा राजेश यावलकार वय ५० वर्षे रा पंतनगर मलकापुर १२. राजेश वसंत चव्हाण वय ५२ वर्षे धंदा मॅनेजर रा किल्ला चौक मलकापुर १३. सुनिता गजानन जाधव वय ५० वर्षे रा मुकाइनगर हनुमान नगर रोड मलकापुर १४. रमेश प्रल्हाद तांदुळे वय ४५ वर्षे धंदा व्यवसाय रा मलकापुर यांच्याविरुद्ध मलकापूर शहर पोलिसांनी अप नं ३६९ / २०२३ कलम ४०६ ४०९ ४२०, ४६८, ४७०३४ भादवी नुसार गुन्हे दाखल करून मा. पोलीस अधिक्षक सा बुलडाणा यांच्या आदेशाने गुन्हयाचा पुढील तपास हा आर्थिक गुन्हे शाखेचे पो.नि.सा. यांना वर्ग करण्यात आला आहे