Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सामुहिक बलात्कार झाला नसल्याचे पीडितेचे बयान राजूर घाट सामूहिक बलात्कार प्रकरणाला वेगळे वळण

 


बुलढाणा शहरातील राजूर घाट येथे ८ जणांनी मिळून महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गुरूवारी घडली होती. या घटनेनंतर बुलढाणा शहरात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी महिलेला मेडिकल चेकअपसाठी पाठवून कसून तपासाला सुरूवात केली होती. मात्र या प्रकरणात नवीनच माहिती समोर आलीये. महिलेने वैद्यकीय चाचणीला नकार दिल्यानंतर वेगळीच सत्य उजेडात आलं. महिलेने नोंदवलेल्या जबाबमुळे पोलिसही चक्रवले.

बुलढाणा जिल्ह्यातील राजूर घाट परिसर हा सध्या हिरवाईने नटला असून प्रचंड असा आकर्षक बनला आहे. याच मार्गावर एक मंदिर देखील आहे. जिथून अतिशय नयनरम्य असं दृश्य पाहायला मिळात. त्यामुळे या मार्गावरून जाणारे अनेक नागरिक देवीच्या मंदिरात थांबून सेल्फी घेतात. १३ जुलै रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास राजूर घाट येथे एक महिला तिच्या नातेवाईकासोबत सेल्फी काढत होती. पण तिथे अचानक ८ जण आले. खरं तर हा संपूर्ण परिसर निर्जन आहे. याच गोष्टीचा फायदा घेऊन पीडित महिलेला आणि तिच्या सोबत असणाऱ्या नातेवाईकाला आरोपींनी चाकूचा धाक दाखवला. त्यानंतर सर्व आरोपींनी महिलेच्या गळ्यावर चाकू लावत तिला जवळच्याच दरीत नेलं. यानंतर त्यांनी आळी पाळीने पाशवी बलात्कार केला. एवढंच नव्हे  तर त्यांच्याकडील ४५ हजार रुपये देखील काढून घेत त्यांनी इथून पळ काढला.

दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळताच बुलढाण्याचे शिवसेना आमदार (शिंदे गट) संजय गायकवाड यांनी थेट बोराखेडी पोलीस ठाणे गाठले. ज्यानंतर रात्रीच बोराखेडी पोलीस ठाण्यात ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या ८ आरोपींपैकी एक आरोपीची ओळख पटली असून त्याचं नाव राहुल गायकवाड असल्याचं समजतं आहे.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आज (१४ जुलै) सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी घटनास्थळाची पाहणी केली. याचसोबत प्रकरणाचे गांभीर्य पाहून एसपींनी दक्षता टीमच्या सदस्याला महिलेशी बोलून वैद्यकीय तपासणी करण्यास सांगितले होते. मात्र महिलेने बलात्कार झालाच नाही तर मेडिकल कशाला, असे म्हटले आहे.

महिलेने सांगितले की, ती आणि तिचे नातेवाईक मंदिरापासून थोड्या अंतरावर असलेल्या एका टेकडीवर बसले होते. तेवढ्यात ८ लोक तेथे आले आणि त्यातील ४ ते ५ लोकांनी त्या महिलेला आणि महिलेसोबत असलेल्या व्यक्तीला घेरले होते. या व्यक्तींची तोंड रूमालाने झाकली होती. या व्यक्तींनी आमच्याकडून ४५ हजार रुपये हिसकावून घेतले. त्यानंतर आम्हाला एका ठिकाणी बसवून त्यांचे फोटो काढून चाकूचा धाक दाखवून या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास तुमची खैर नाही, असे धमकावले होते. याचसोबत पोलिसांनी महिलेला मेडिकप चेकअप करण्यास सांगितले होते. मात्र आरोपीने तिच्यावर बलात्कार केला नाही, त्यामुळे मेडिकल करण्याची गरज नाही, असे आता महिलेने वैद्यकीय अधिकाऱ्याला लेखी स्वरूपात दिले आहेत