खामगाव- गेल्या काही दिवसांपासून महापुरूषांवर वादग्रस्त विधान केल्यामुळे चर्चेत असलेले संभाजी भिडे यांच्या खामगाव येथील सभे दरम्यान त्यांच्या विधानाचा निषेध करत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काळे झेंडे दाखवण्यात आले.
समाजविघातक व देश विघातक वक्तव्य करणारे व भीमा कोरेगाव दंगली मधील प्रमुख आरोपी असलेले संभाजी भिडे हे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच साई बाबा यांच्यावर टीका करत वादग्रस्त विधान करीत आहे यामुळे सर्वत्र त्यांचा निषेध केला जात आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पार्लमेंटरी बोर्ड सदस्य अशोक सोनोने ,पश्चिम विदर्भ उपाध्यक्ष शरद वसतकार, जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे, जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे, युवा जिल्हाध्यक्ष अनिल वाकोडे यांचे नेतृत्वाखाली खामगाव येथे कार्यक्रम स्थळी संभाजी भिडे विरोधात जोरदार निदर्शने करून काळे झेंडे दाखवण्यात आले यावेळी आक्रमक झालेल्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे आणले, या आंदोलनात खामगाव तालुकाध्यक्ष प्रभाकर वरखेडे, मलकापूर तालुकाध्यक्ष सुशील मोरे, बाजार समिती उपसभापती संघपाल जाधव, निवृत्ती मांजुळकर, रवी मोरे, नितीन सूर्यवंशी, प्रकाश दांडगे, भारतीय बौद्ध महासभा शहर अध्यक्ष दादाराव हेलोडे, रामेश्वर तायडे, अंबादास डोळे, रवी धुरंधर,सुमित वाकोडे, राहुल हेलोडे, विजय निंबाळकर, संदेश मनोज बागडे, जय इंगळे, यशवंत गवळी, संकेत गवळी,प्रमोद जावडेकर शुभम गवई, संजय मिसाळ, अमोल शेगोकार,चेतन वाकोडे, शुभम मोरे, आकाश बोर्डे, राज वानखडे,तुषार सरदार आदी सहभागी झाले होते.