Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बुलडाणा आगार व्यवस्थापक संतोष वानरे व वाहक महादेव सावरकर लाच स्वीकारताना एसीबीच्या तावडीत

 

बुलडाणा प्रतिनिधी 

पंढरपूर यात्रे दरम्यान बस मध्ये स्टोव्ह पेटवून स्वयंपाक करण्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता या प्रकरणी कोणतीही कार्यवाही न करण्यासाठी लाच मागणाऱ्या बुलडाणा आगार व्यवस्थापक संतोष वानरे व वाहक महादेव दगडू सावरकर या दोघांना सात हजार रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. पंढरपूर यात्रे दरम्यान बस मध्ये स्टोव्ह पेटवून स्वयंपाक करण्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता या प्रकरणी बुलडाणा आगार प्रमुख संतोष महादेव वानरे वय (५०) वर्ष यांनी व्हिडिओ वरून कोणतीही कार्यवाही न करण्यासाठी तक्रार दाराला ४० हजार रुपयाची लाच मागितली होती

 वानरे यांनी बुलडाणा आगारात त्यांचे मावस भाऊ महादेव सावरकर यांच्या मार्फत २८ हजार रुपये तक्रारदाराकडून स्वीकारले आणि उर्वरित सात हजार रुपयाची लाच स्वीकारताना काल रात्री शहरातील खामगाव रोडवर लाचलुचपत प्रतिबंधक) विभागाने सापळा रचून या दोघांना रंगेहाथ पकडले आहे. सदर ची कारवाई पोलीस अधीक्षक मारोती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक श्रीमती शितल घोगरे पो. नि. सचिन इंगळे, पोहेकॉ. मोहम्मद रिजवान, राजू क्षीरसागर, प्रवीण बैरागी ना. पो. शि. विनोद लोखंड, जगदीश पवार, रवींद्र दळवी, सुनील राऊत पोकों, गजानन गाल्डे, मपोकों स्वाती वाणी चापोका शेख अर्षद सर्व ला.प्र.वि बलडाणा यांनी केली आहे.