Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मलकापूर शहर पोलिसांची गांजा तस्करी करणाऱ्यावर धडक कारवाई

 


दिनांक १२/०८/२०२३ रोजी पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी पोस्टे मलकापुर शहर यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली आहे की, एक इसम त्याचे ताब्यातील पांढया रंगाच्या सुझुकी कार क्रमांक ए.पी. ३५ एस-२३४७ मध्ये मानवी मेंदुवर विपरीत परीणाम करणारा गांजा अमली पदार्थ वाळगुन राष्ट्रीय महामार्ग क्र. ०६. वरील खामगांवकडून मलकापुरकडे घेवुन जाणार आहे. त्यानुसार सोबत नापोको १३२३ पंजाबराव शेळके व तसेच डिवी पथकाचे सपोनि, के.पी तायडे पोकों/ ३११ आसिफ शेख, पोको / ९९४ प्रमोद राठोड, पोको २३१२ ईश्वर वाघ, पोकों/ २५ गोपाल तारुळकर, पोको / २७३२ प्रविण गवई, पोको १२५४ आनंद माने, पोकों/ २३१३ गोपाल इंगळे, पोको/८९८ मंगेश चरखे असे पेट्राली ड्युटी करीत असतांना असुन सदर बातमीची पडताळणी करून सदर इसमावर कायदेशिर कारवाईची तयारी करून छापा कारवाई करा.

असे पोस्टे मलकापुरचे पोनि अशोक रत्नपारखी यांनी आदेशित केले. तदनंतर पोस्टे मलकापुरचे पोनि अशोक रत्नपारखी व पोस्टे स्टॉप राष्ट्रीय महामार्ग क्र. ०६ वरील खामगांव व मलकापुर रोडवरील कन्हैय्या हॉटेलच्या बाजुला पोहचुन बातमीतील नमुद वाहनाचा शोध घेत असतांना सदर वाहण कन्हय्या हॉटेच्या परिसरात पार्क केलेली दिसली व त्यातील दोन इसम सदर वाहणाच्या पाठीमागे उभे होते त्यांनी आम्हा पोलीसांना पाहून पळ काढला असता त्यातील एक इसमास आम्ही जागीच पकडले त्यांचे नाव गाव विचारले असता, त्याने त्याचे नाव अजयकुमार नित्यानंद भत्रा वय २६ वर्ष रा. आरएससी- १४ धारागुडा जि. मलकानगिरी राज्य ओडीसा असे सांगितले वरून त्यांचे कडुन ६९ किलो ५०० ग्रॅम प्रति किलो किंमत १२,०००/ एकुण एकुण ८,२६,८००/- रुपयांचा गांजा व एक सुझुकी कंपणीची कार क्रमांक ए.पी-३५ एस. २३४७ किंमत अंदाजे ५,००,०००/- रुपये असा एकूण १३,२६,८००/- रुपयांचा मुददेमाल मिळून आल्याने पोस्टे मलकापुर ४१९ / २०३ कलम ८ (क). २० (ब), (ग), (व) एनडीपीएस अॅक्ट व प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील पोस्टे मलकापुरचे पोनि अशोक रत्नपारखी करीत आहेत. 

सदरची कार्यवाही व तपास मा. सुनिल फडासने साहेब पोलीस अधिक्षक बुलडाणा, मा. अशोक थोरात साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक खामगांव, मा. देवराव गवळी साहेब उपविभागिय पोलीस अधिकारी मलकापुर व पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी मा पोस्टे मलकापुर शहर यांचे मार्गदर्शनाखाली मलकापुर शहर पोलीस स्टेशनचे डिवी पथकाचे सपोनि. के. पी. तावडे पोकों / ३११ आसिफ शेख, पोको ९९४ प्रमोद राठोड, पोको / २३१२ ईश्वर वाघ, पोकॉ/२५ गोपाल तारळकर, पोकों / २७३२ प्रविण गवई, पोकों/ १२५४ आनंद माने, पोकों / २३१३ गोपाल इंगळे, पोकों/८९८ मंगेश चरखे व पोकों/ २०१३ संतोष कुमावत यांनी केली आहे.