Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

काळी-पिवळीला कंटेनरची जबर धडक; १० जण जखमी

 


मलकापूर (प्रतिनिधी)- 

राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरील मुंदडा पेट्रोल पंपानजीक काळी पिवळी व कंटेनरच्या झालेल्या भीषण अपघातात १० जण जखमी झाल्याची घटना ८ सप्टेंबर रोजी दु. ३ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, खामगाव कडून मलकापूरच्या दिशेने येत असलेले काळीपिवळी क्र. एम. एच. ३० एफ ९४०३ ही रस्त्यावर जनावरे उभी असल्याने थांबली असतानाच मागून भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनर क्र. जे. एच १० बी.जे ३२६३ ने काळीपिवळीला धडक दिली. ही धडक एवढी जबर होते की अक्षरक्षा काळीपिवळी दोन पलट्या खाऊन रस्त्याच्या कडेला पडली, यामध्ये रस्त्यावर उभी असलेली दोन जनावरे ठार झाली असल्याचे समजते.

 तर या अपघातात ज्ञानेश्वर भगवान कुराडे (वय २८ वर्ष) रा. पान्हेरा, सपना न्यानेश्वर कुराडे (वय २३ वर्ष) रा. पान्हेरा, सुशिलाबाई शिंदे (वय ६५ वर्ष) रा. देऊळगाव गुजरी, रोहित मनोहर इंगळे (वय ३१ वर्ष. चिखली, विजय वसंत बोंडे रा. विटाळी, शिवाजी दिनकर किरण (वय २४ वर्ष) रा. विटाळी, राज लक्ष्मण लक्ष्मण बोंडे (वय ५० वर्ष) रा. विटाळी, भगवान लक्ष्मण सोले (वय ६० वर्ष) रा. खामगाव, शत्रुघ्न तुळशीराम टवळकर (वय ४५ वर्ष) रा.धानोरा, अब्दुल शकील अब्दुल जब्बार (वय ४५ वर्ष) रा. वडनेर तर ट्रक चालक असलम अन्सारी कयूम अंसारी (वय ४० वर्ष) रा. छत्तीसगढ़ है या अपघातात जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तसेच ओमसाई सर्विसची रुग्णवाहिका चालक भूषण धोरात पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ जखमींना मलकापूर रुग्णालयात दाखल केले.